प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक मतदार
प्रभाग १० मध्ये सर्वात कमी मतदार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : ठाणे पालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर गुरुवारी (ता. २१) मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार हा प्रभाग क्रमांक ८ मध्ये असून, सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक १० मध्ये असल्याची नोंद करण्यात आली आहे.
चार सदस्यीय पॅनेल पद्धतीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असली तरी यामध्ये मतदारांची संख्या वाढली आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये १२ लाख २८ हजार ६०६ इतकी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे चार सदस्यीय प्रभागात एक प्रभाग हा आता ४० हजार ते सर्वात मोठा ६६ हजारांचा झाला आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये बाळकुम, माजिवडा, हायलॅन्ड आदी महत्त्वाच्या भागांचा समावेश असून, या ठिकाणी शिंदे सेनेचा वरचष्मा राहिलेला आहे. आता हाच प्रभाग प्रारूप मतदार यादीत सर्वात मोठ्या मतदारांचा प्रभाग ठरला आहे. या ठिकाणी ६६ हजार ८३५ मतदार असून, त्यात ३२ हजार ४५८ स्त्री आणि ३४ हजार ३७१ पुरुष मतदार नोंदणी झाली आहे. घोडबंदर भागातील प्रभाग क्रमांक १ मध्ये ६० हजार ६८ मतदारांची नोंद झाली आहे. प्रभाग क्रमांक ३३ या मुंब्य्रातील भागात ५९ हजार ९६२ मतदारांची नोंद दिसत आहे. सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक १० मध्ये असून, ४० हजार ८८८ मतदार आहेत. या प्रभागात साकेत, के व्हिला, वृंदावन आदी महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी २० हजार १०८ स्त्री तर २० हजार ७७८ मतदार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १९ मध्ये ४० हजार ९५८ मतदार आहेत.
दरम्यान, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या सहा लाख ६७ हजार ५०४ एवढी होती. आता ही संख्या आठ लाख ६३ हजार ८७८ झाली आहे. याचाच अर्थ पुरुष मतदारांची संख्या ही एक लाख ९६ हजार ३७० ने वाढली आहे, तर महिला मतदारांची संख्या २०१७ मध्ये पाच लाख ६१ हजार ०८७ एवढी होती. आता ही संख्या सात लाख ८५ हजार ८३० एवढी झाली आहे. त्यानुसार आता महिला मतदारांची संख्या ही दोन लाख २४ हजार ७४३ ने वाढली आहे.
२०२७ मधील मतदानाची स्थिती
पुरुष मतदार - ६,६७,५०४
स्त्री मतदार - ५,६१,०८७
इतर - १५
एकूण मतदार - १२,२८,६०६
.....................
जुलै २०२५ मधील मतदारांची संख्या
पुरुष - ८ लाख ६३ हजार ८७८
स्त्री - ७ लाख ८५ हजार ८३०
..........................
प्रारुप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख - २७ नोव्हेंबर
हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे - ५ डिसेंबर
मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करणे - ८ डिसेंबर
मतदार केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे - १२ डिसेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.