राज्यभरात रविवारी ‘टीईटी’
चार लाख ७५ हजार उमेदवार; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक
मुंबई, ता. २० : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता. २३) होत आहे. या परीक्षेसाठी यंदा चार लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी नाव नोंदवले आहे. राज्यभरात १,४२० केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, यात मुंबईतील १८ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
टीईटीच्या या परीक्षेला सर्वाधिक ३७ हजार २९३ असे उमेदवारांचे अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातून आले आहेत. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातून ३२ हजार ०३१ जणांनी अर्ज करून परीक्षेसाठी नोंदणी पूर्ण केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातून १६ हजार ९१४ उमेदवार परीक्षेला सामोरे जाणार आहेत. यात मुंबई दक्षिण ३,५०७, मुंबई पश्चिम ४,९८१ आणि मुंबई उत्तर ४,१६२ उमेदवारांचा समावेश आहे. ठाण्यातूनही १६,९१४ इतक्या उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
--
दोन पेपरसाठी परीक्षा
टीईटीच्या पेपर १ साठी २,०३,३३३, तर पेपर २ साठी २,७२,३३५ उमेदवार परीक्षेला बसतील, तर पेपर २ मधील समाजशास्त्र विषयाला सर्वाधिक १,७०,५४१, तर गणित विषयाला १,०१,७९४ उमेदवार परीक्षेला बसून आपले नशीब अजमावणार आहेत.
--
अशी आहे राज्यभरातील नोंदणी
पुणे - ३७,२९३
मुंबई - १६,९१४
नांदेड -२६,१३७
संभाजीनगर -२४,२००
अहिल्यानगर २२,८५०
लातूर -२१,७४४
सोलापूर - २१,३०५
धुळे - १५,४७९
जळगाव - १३,२००
नंदुरबार - १०,२५८
कोल्हापूर - १९,८३९
सातारा - ११,९७१
सांगली - १२,२४३
पालघर - ९,६२४
रायगड - ५,९७४
रत्नागिरी - ४,३५१
सिंधुदुर्ग - २,४२३
जालना - ८,२७५
बीड - १३,९९१
परभणी - ११,०५७
हिंगोली - ५,३०८
अमरावती - १५,१५४
बुलढाणा - ११,२८३
अकोला - ९,७९४
वाशिम - ८,२४०
यवतमाळ - १०,३७३
नागपूर - १६,४९१
भंडारा - ८,७७६
गोंदिया - ८,४१५
वर्धा - ३,७७७
चंद्रपूर - ९,२८४
गडचिरोली - ७,०३८
धाराशिव - ७,९२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.