टोरेंट पॉवरची वीज अचानक खंडित
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडीत कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीज खंडित करण्याच्या घटना वाढल्या असून, यामुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, वीज खंडित असताना तक्रार नोंदवण्यासाठीची मदतवाहिनीही बंद अथवा सतत ‘व्यस्त’ राहत असल्याने ग्राहक हवालदिल होत आहेत.
भिवंडीत वीजपुरवठा आणि बिलवसुलीची जबाबदारी सरकारने टोरेंट पॉवरला फ्रँचायसी पद्धतीने दिली आहे. कंपनीने अत्याधुनिक उपकरणे बसवून सुरुवातीला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र १५ दिवसांपासून कासारआळी, ब्राह्मण आळी, बाजारपेठ अशा मध्यवर्ती भागांत अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. हा परिसर दर्गारोड आणि निजामपूर फिडरवर अवलंबून आहे. परंतु सकाळी आणि सायंकाळी म्हणजेच अत्यंत महत्त्वाच्या वेळेला वीज गेल्याने व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प पडतात.
या भागात दवाखाने आणि रुग्णालयेही असल्याने त्यांच्या कामकाजावरही मोठा परिणाम होत आहे. एवढेच नव्हे, काही दिवसांपासून धार्मिक सप्ताहातील कार्यक्रमांनाही अडथळे निर्माण झाले आहे. तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मदतवाहिनीवर संपर्क केल्यास ती बंद असल्याचा किंवा सतत व्यस्त असल्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात टोरेंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.