राष्ट्रीय स्पर्धेत दोन पदके
नेरूळ (बातमीदार)ः नेरूळ मधील सेंट ऑगस्टीन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १८ व्या जीएफआय राष्ट्रीय ग्रपलिंग चॅम्पियन २०२५ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत दोघांनी कांस्य पदके पटकावले आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा दक्ष साळुंके, इयत्ता तिसरीत शिकणारी मनहा शेक यांनी कांस्यपदके मिळवले. विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक गणेश यांनी प्रशिक्षण दिले होते. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या प्रयत्नांचे शाळेने कौतुक केले आहे.
तसेच संस्थेला सन्मान मिळवून दिल्याबद्दल पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.