पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) ः फळांप्रमाणे बाजारात पालेभाज्यांची कमतरता आहे. परिणामी, भाव दुप्पट झाले असून १० रुपयांना मिळणारी एक जुडी ३० ते ४० रुपयांना विकली जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.
हिवाळ्यात हिरव्या भाज्यांसाठी अनुकूल वातावरण असते. या काळात फळभाज्या, पालेभाज्यांची आवक वाढते. यंदा मात्र लांबलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली आहे. अतिरिक्त पावसामुळे भाज्यांच्या लागवडीत उशीर झाल्याने भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी, मुंबई तसेच उपनगरात पुरवठा कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत.
----------------------
प्रकार जुडीचा भाव
कोथिंबीर - ३०
पालक - ३०
मुळा- ३०
कांदा पात - ३०
मेथी - ४० ते ५०
शेपू - ४०