मुंबई

आई बाबा फाऊंडेशनतर्फे ब्लँकेट वाटप

CD

आई-बाबा फाउंडेशनतर्फे ब्लँकेटवाटप
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः मुंबईसह राज्यातील तापमानात घट होत असताना शहरात थंडीची चाहूल चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने आई-बाबा फाउंडेशनतर्फे टाटा रुग्णालय परिसरातील रुग्ण व नातेवाईक तसेच पदपथावर रात्रीचा आश्रय घेणाऱ्या बेघर नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
कै. संताजी गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त फाउंडेशनचे संस्थापक योगेश मौर्य यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. थंडीच्या काळात मदतीची सर्वाधिक गरज असलेल्या घटकांपर्यंत ऊब पोहोचवण्याचा फाउंडेशनचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. समाजातील वंचित घटकांना आनंदाचा क्षण देणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणे, हे फाउंडेशनचे सामाजिक भान असल्याचे संस्थापक योगेश मौर्य यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT