महिला मतदारांची वाढ चिंताजनक!
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत मतदार वाढ संथ
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत मागील दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची वाढ केवळ एक लाख ७३ हजार ८७४ इतकी झाली आहे. वाढीव मतदारांची संख्या १२.२० टक्के इतकी आहे. या वाढीमध्ये महिला मतदारांची वाढ अत्यंत कमी असून, महिलांची वाढीव मतदार संख्या दहा हजारांचा आकडा गाठू शकली नाही, ही बाब चिंतेची आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर निवडणुका होणार आहेत. यासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या निवडणूक विभागाने गुरुवारी (ता. २०) मतदार यादी प्रसिद्ध केली. मागील निवडणुकीच्या तुलनेने यंदाच्या निवडणुकीत एक लाख ७३ हजार ८७४ मतदार वाढले आहेत. यामध्ये पुरुष मतदार १२.२० टक्के तर महिला मतदारांची १.४५ टक्के वाढ झाली. ही नगण्य असून या पालिका निवडणुकीत महिला मतदारांनी अनुत्सुकता दाखवित पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
०१५ सालची निवडणूक सध्याची निवडणूक वाढ (संख्या)
एकूण मतदार १२,५०,६४६ १४,२४,५२० १,७३,८७४
पुरुष मतदार ५,८१,९१६ ७,४५,३९२ १,६३,४७६
महिला मतदार ६,६८,७३० ६,७८,५७६ ९,८४६
इतर मतदार - ५५२ - -
प्रभाग ३१ सर्वात मोठा; प्रभाग ६ सर्वात लहान
पालिकेच्या १२२ जागांसाठी चार सदस्यांचे २९ प्रभाग व तीन सदस्यांचे दोन प्रभाग अशा ३१ प्रभागांमध्ये सर्वात जास्त मतदार असलेला प्रभाग क्रमांक ३१ मध्ये असून ६७ हजार ३०१ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक सहामध्ये असून एकूण २८ हजार ८७३ मतदार आहेत.
मतदार संख्या कमी होण्याची कारणे
मुंबई/ठाण्यात नोकरीसाठी जाणाऱ्यांना कामाच्या व्यापातून मतदार नोंदणीसाठी वेळ मिळत नाही. मतदार नोंदणीच्या सर्वेक्षणावेळी घरी कोणी नसल्यास नावे वगळली जातात. मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदार नावे आढळल्याने ती यादीतून वगळण्याचे काम सुरू आहे, ज्यामुळे एकूण मतदार संख्या वाढीवर परिणाम झाला आहे. भाड्याच्या घरात राहणारे मतदार पत्ता बदलत नसल्याने, तपासणीवेळी पत्त्यावर मतदार राहत नसल्यास त्यांची नावे वगळली जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.