उर्दू पत्रकांवरून भाजपवर शरसंधान
उरणमधील प्रचारावरून विरोधकांचे टिकास्त्र
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२२ : उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने मुस्लिम बहुल भागात उर्दू भाषेतील प्रचार पत्रके वाटली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा नारा देत राजकीय भूमिका मांडणाऱ्या भाजपविरोधात विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे.
उरण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये नम्रता ठाकूर, सुरेश शेलार निवडणुकीच्या रिगंणात आहेत. या प्रभागात मोरा, बोरी, भवरा, आनंद नगर, कामाठा कामगार वसाहत, मुस्लिम मोहल्ला बौद्धवाडा, कोटनाका परिसराचा समावेश होतो. येथे ३ हजार पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे ही मते निर्णायक ठरणार आहेत. पण देशभरात भाजपकडून होणाऱ्या अपप्रचाराने नाराजी आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उर्दू भाषेत पत्रके छापून त्यांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. पण या प्रकारामुळे विरोधकांकडून भाजपवर टिका केली जात आहे.
--------------------------------
आरोप-प्रत्यारोप
भाजपने नेहमी मुस्लिमविरोधी भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेत्यांनी उरणमध्ये येऊन मुस्लिमांवर जहरी टीका केली आहे. आता, निवडणुकीत त्यांची मतांपुरता वापर करण्यासाठी अशी पत्रके वाटल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी सांगितले. तर देशातील इतर भाषांप्रमाणे उर्दु ही माध्यमाची भाषा आहे. उर्दू भाषेतील गझल सर्वांना आवडते. मग उर्दु भाषेत पत्रके छापली तर गैर काय आहे. नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषेचा वापर केल्याचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.