मुंबई

नवी मुंबईत मविआ निषभ्र

CD

नवी मुंबईत मविआ निषभ्र
समन्वयाचा अभाव असल्याने कार्यकर्ते गोंधळात
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला आहे. एकीकडे महायुतीतील शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, ठाकरे गटात समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवत आहे.
नवी मुंबई महापालिकेत कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. वनमंत्री गणेश नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाची वाताहत झाली आहे. निवडक माजी नगरसेवकांच्या ताकदीवर शरद पवार गटाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला उभारी घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ठाकरे गट, काँग्रेसचीदेखील अशीच अवस्था आहे. मातब्बर नगरसेवक भाजप, शिंदे गटात गेल्याने भक्कम विरोधी पक्षनेता देणारी काँग्रेस खिळखिळी झाली आहे. पक्षाची मोर्चेबांधणी करताना ज्येष्ठांना विचारले जात नाही. ठाकरे गटात आलबेल नाही. एकमेकांवर होणाऱ्या कुरघोड्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. बेलापूर मतदारसंघात नगरसेवक राहिलेले नाहीत. वाशी मतदारसंघात ऐरोलीमध्ये थोडीफार ताकद असल्याने भाजप, शिंदे सेनेला कडवे आव्हान उभे करण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे.
-------------------------------------
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा नाही. महाविकास आघाडीच्या नवी मुंबईतील नेत्यांची बैठक घेणार आहे. कोणत्या पक्षाला किती जागा हव्या आहेत, याबाबत चर्चा करू.
- शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट
------------------------
काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. शहराला विरोधी पक्ष देण्याची धमक असलेला हा पक्ष येत्या निवडणुकीत नक्कीच सत्तेवर येईल.
- रवींद्र सावंत, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT