मुंबई

वासिंदला जोडणाऱ्या शेरे–गेरसे रस्त्यांची दुरवस्‍था

CD

वासिंदला जोडणाऱ्या शेरे–गेरसे रस्त्यांची दुरवस्‍था
खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांत वाढ; उपाययोजनेची मागणी
शहापूर, ता. २२ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील वासिंद गावाची प्रमुख बाजारपेठ शेरे व गेरसे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर जागोजागी खोल खड्डे पडल्याने रहिवाशांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे.
वासिंद पूर्व भागाला जोडणारे हे रस्ते पुढे थेट कल्याण तालुक्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे शहापूर आणि कल्याण या दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या रस्त्यांवरून दररोज कामगार, विद्यार्थी, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वासिंद परिसरातील सुमारे ४२ गावे याच रस्त्यांवर अवलंबून असल्यामुळे या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात काही खड्डे बुजविण्याचे काम केले होते. मात्र ही कामे केवळ वरवरची ठरल्याने काही दिवसांतच डांबरी रस्ता पुन्हा उखडून गेला. खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी आता रस्त्यावर पसरल्याने वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर या रस्त्यांवरील खड्डे पाण्याने भरून अदृश्य होत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
..........................
शासकीय वाहनांनादेखील फटका
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत या मार्गावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही नागरिकांना गंभीर दुखापतीही झाल्या असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व शासकीय वाहनेही या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वेळेवर गंतव्यस्थळी पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. या रस्त्यांचे तातडीने संपूर्ण नुतनीकरण करून मजबूत डांबरीकरण करण्याची मागणी गावकरी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT