मुंबई

बी.एन.एन. महाविद्यालयात जागतिक दूरदर्शन दिन साजरा

CD

बी.एन.एन. महाविद्यालयात जागतिक दूरदर्शन दिन साजरा
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : जागतिक दूरदर्शन दिनाचे औचित्य साधून बी.एन.एन. महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दूरदर्शन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. जागतिक घडामोडी, सामाजिक प्रश्न, देश-विदेशातील स्थिती यांची माहिती घरबसल्या टीव्हीच्या माध्यमातून मिळते. बदलत्या डिजिटल युगातही दूरदर्शनची पकड मजबूत आहे आणि ते आजही आपल्या जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते विनायक सिंग, प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर, उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डॉ. निनाद जाधव, डी. एल. अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे पुढे म्हणाले की, टेलिव्हिजनमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. ज्ञानाचे आदानप्रदान वेगाने होत असून समाज अधिक प्रगल्भ होत आहे. महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमांची ओळख करून देऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम यांनी आपल्या भाषणात बदलत्या काळाचा दाखला देत सांगितले, की पूर्वी ‘टीव्ही पाहू नका, डोळे खराब होतील’ असे सांगितले जायचे. आज मात्र ‘मोबाईल पाहू नका, डोळे खराब होतील; त्याऐवजी टीव्ही पाहा’ असे सांगण्याची वेळ आली आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दूरदर्शन हे सुरुवातीपासूनच केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता समाज परिवर्तनाचे साधन ठरले आहे. तुमच्यात जर प्रतिभा असेल तर जग तुम्हाला पाहील. त्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT