मुंबई

वस्त्रोद्योगाला मिळणार सौर ऊर्जा प्रकल्पांची वीज

CD

सौरऊर्जा प्रकल्पांतून
वस्त्रोद्योगाला वीज

राज्य सरकार आराखडा तयार करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला सौरऊर्जा प्रकल्पाची वीज देण्याची मोहीम जोरात सुरू असतानाच आता वस्त्रोद्योगही सौरऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्या पार्श्वभूमीवर विखुरलेल्या वस्त्रोद्योगात सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, कुठे सौर प्रकल्प उभारावे लागतील, याबाबतचा आराखडा राज्य सरकारकडून तयार केला जाणार आहे. दरम्यान, वस्त्रोद्योग सौरऊर्जेवर गेल्यास राज्यावर पडत असलेला वीजदर सवलतीच्या अनुदानाचा भार कमी होऊ शकणार आहे.

राज्यभरात पाच-सहा लाख वस्त्रोद्योग असून त्यांना महावितरणकडून सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. या वीजबिलाच्या शेकडो कोटी रुपयांच्या सवलतीचा भार अनुदान रूपाने राज्याच्या तिजोरीवर पडतो. शेतकऱ्यांच्या वीजबिल सवलतीचा भार सरकारवर पडत आहे. सौरऊर्जा प्रकल्पात स्वस्तात तयार होणारी वीज, सौर कृषी पंप असे पर्याय उपलब्ध करून दिल्याने हा भार टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. त्याच धर्तीवर वस्त्रोद्योग सौरऊर्जेवर चालवण्याचा सरकारचा विचार असल्याचे ऊर्जा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT