मुंबई

वांद्र्याच्या बीपीई शाळेत डुकराचा थरार

CD

वांद्र्याच्या बीपीई शाळेत डुकराचा थरार
विद्यार्थी, शिक्षकांची पळापळ; काही जण जखमी
मुंबई, ता. २२ : वांद्र्याच्या बीपीई शाळेत शनिवारी (ता. २२) एक डुक्‍कर घुसल्‍याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थी स्‍नेहसंमेलनाच्या तयारीत असताना ही घटना घडली. अचानक ओढवलेल्‍या या प्रसंगामुळे विद्यार्थी, शिक्षकांची एकच पळापळ सुरू होती. अखेर स्‍थानिकांनी डुकराला पकडल्‍यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.
शाळेचे पटांगण दुपारी विद्यार्थ्यांनी भरलेले होते. काही विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या तयारीच्या लगबगीत तर काही खेळांमधे दंग होते. तेवढ्यात मोठा चित्कार करीत अर्धा टन वजनाचे पिसाळलेले डुक्कर पटांगणात शिरले. प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गांमध्ये बंद करण्यात आले. शाळेत भयाणता पसरली होती. शाळेच्या मुख्य दरवाजाबरोबर वर्गखोल्‍यांचेही दरवाजे बंद करण्यात आले. पटांगणावर जमा झालेल्या बघ्यांना कोकणात चालणाऱ्या डुकरांच्या शिकारीची आठवण झाली. संतापलेल्या डुकराने पळून जाण्यासाठी शाळेच्या लहान लोखंडी दरवाजावर मोठी धडक देऊन लोखंडी गजही वाकवले. पुन्हा शाळेच्या मागे असलेल्‍या शौचालयाच्या दिशेने पळाले. तासाभराच्या धावपळीने थकलेल्या मोठ्या धुडाला दोरीच्या फासकीत पकडण्यात स्‍थानिकांना यश आले.
काही जणांना चावा घेतलेल्या त्या डुकराला जेरबंद करताना पकडणाऱ्यालाही जखमी व्हावे लागले. दोरीच्या सहाय्याने बांधून दुचाकीवर कसेबसे कोंबून डुकराला वांद्रे पूर्वेत नेल्‍यानंतर विद्यार्थी, बघ्यांनी सुस्कारा सोडला.
या शाळेला गेले काही महिने शाळेच्या शौचालयामागे राहणाऱ्या बंगाली महिलेच्या घुसखोरीने जेरीस आणले होते. याच महिलेच्या कुत्र्यांनी शाळेच्या आवारात धुडगूस घातला होता. विद्यार्थ्यांना चावे घेतले होते. वांद्रे पोलिस, पालिका प्रशासनाला न जुमानणाऱ्या या महिलेचा जाच अद्याप संपला नसतानाच ही घटना घडल्‍याने विद्यार्थी दहशतीखाली होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT