मुंबईतील इक्षु शिंदे यांचा गौरव
अमेरिकेतील इन्स्टिट्यूटतर्फे ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : मुंबईतील विद्यार्थिनी इक्षु शिंदे हिची अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूटतर्फे ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ म्हणून निवड झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, धोरण अभ्यास आणि समाजहिताची जाण यांचा समतोल साधणाऱ्या इक्षु हिला हा सन्मान तिची अभ्यासू कार्यशैली आणि कल्पक दृष्टिकोनामुळे देण्यात आला आहे.
‘‘इक्षु विश्लेषणात्मक विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रभावी मिश्रण घडवते. नैतिक व बौद्धिक चौकट घडवणाऱ्या पुढील पिढीतील जागतिक नेतृत्वात ती महत्त्वाची भूमिका बजावेल,’’ संस्थेने तिच्या निवडीविषयी असे विशद केले आहे.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची बारावीतील विद्यार्थिनी असलेल्या इक्षु हिने शाळेतील उत्तम शैक्षणिक कामगिरीसोबत सामाजिक सहभागातही आपली वेगळी छाप निर्माण केली. महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान मतदार जागृती उपक्रम राबवताना तिने कार्यशाळा आणि रॅलींचे आयोजन केले. या मोहिमेद्वारे ८,००० हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचत जागरूकता निर्माण करण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला. ज्येष्ठ नागरिकांसाठी तिने अनेक सामाजिक उपक्रम राबवले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासोबतच कलाविश्वातही इक्षुचे योगदान ठळक आहे. तिने सुमारे एका दशकापासून भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय आणि समकालीन नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
--
विश्वास सार्थ ठरविणार
हा सन्मान स्वीकारताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरच्या वंशज असलेल्या व समाजकारणाचा वारसा लाभलेल्या इक्षू शिंदे हिने गॅरीबे इन्स्टिट्यूटचे आभार मानले. त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. इक्षु शिंदे हिला मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.