मुंबई

आज रविवारी राज्यभरात टीईटीची परीक्षा

CD

राज्यभरात आज टीईटीची परीक्षा
मुंबई, ता. २२ ः राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता. २३) होत आहे. ही परीक्षा सकाळी १०.३० ते १ आणि दुपारी २.३० ते ५ या वेळात दोन सत्रांत होणार आहे. या परीक्षेला यंदा चार लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी परीक्षेसाठी आपले नाव नोंदवले आहे. राज्यभरात टीईटीची ही परीक्षा यंदा एकूण १,४२० केंद्रांवर होणार आहे. यात मुंबईतील १८ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. या परीक्षेला उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईच्या टीईटीसाठी तीन विभागांतून मिळून १२,५८१ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यात मुंबई दक्षिण ३,५०७, मुंबई पश्चिम ४,९८१ आणि मुंबई उत्तर ४,१६२ उमेदवारांचा समावेश आहे. ठाण्यातूनही १६,९१४ इतक्या उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. ही परीक्षा दोन पेपरसाठी होईल. यात पेपर-१ साठी २,०३,३३३, तर पेपर-२साठी २,७२,३३५ उमेदवार परीक्षेला बसतील. तर पेपर-२ मधील समाजशास्त्र विषयाला सर्वाधिक १,७०,५४१, तर गणित विषयाला १,०१,७९४ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT