मुंबई

अंधेरीत रासायनिक गळती

CD

अंधेरीत रासायनिक गळती
एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई , ता. २२ : अंधेरी एमआयडीसी परिसरात रसायनाची गळती झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यात तिघे जण अत्यवस्थ झाले. त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तत्पूर्वी एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. अहमद हुसेन (वय २० वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून, नौशाद अन्सारी (वय २८ ) आणि सबाह शेख (वय १७) अशी जखमींची नावे आहेत.
अंधेरी एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी भागात एका इमारतीत शनिवारी रसायनाची गळती झाली. रासायनिक गळती नेमकी कुठून झाली याचा शोध सुरू असताना इमारतीजवळ तिघे जण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने परिसरात धावपळ उडाली. अग्निशमन दलाकडून तत्काळ बचावकार्य हाती घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, गळती झालेला रासायनिक पदार्थ नेमका कोणता आहे, याचा तपास करण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT