मुंबई

वाहनचालकांना आर्थिक भूर्दंड

CD

वाहनचालकांना आर्थिक भूर्दंड
थांबा रेषा नसल्याने वाहतूक पोलिसांकडून दंड
वाशी, ता.२२(बातमीदार)ः नवी मुंबईतील रस्त्यांवर वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी सिग्नल यंत्रणेजवळ थांबा रेषा, झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावरील विभाजन पट्टे रंगवण्यात येतात. मात्र, पावसाळा संपल्यानंतर अनेक ठिकाणी असे पट्टे गायब आहेत. परिणामी, वाहनचालक आर्थिक भूर्दंड बसत आहे.
वाहतूक नियंत्रणात थांबा रेषा, झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व मोठे असते. वाहनचालकांनी सिग्नलवर थांबताना थांबा रेषाच्या बाहेर थांबावे, यासाठी काही चिन्हांकनाचा वापर केला जातो. मात्र, सध्या रेषा दिसत नसल्याने वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, रबाळे, बेलापूर, नेरुळ तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रमुख चौकांसह अंतर्गत रस्त्यांवर अशा रेषा पुसट झाल्या आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग, वाहतूक नियंत्रण राखताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे. तर अनेक ठिकाणी पोलिसांशी वादावादीचे प्रकारही उद्भवत आहेत.
-------------------
पालिकेचे उशिराचे शहाणपण
नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना या संदर्भात विचारले असता सिग्नलजवळील थांबा रेषा, झेब्रा क्रॉसिंग गायब झाल्या आहेत. त्या ठिकाणी पुन्हा पट्टे मारण्यात येईल, असे सांगितले. तर अशा ठिकाणी तातडीने पट्टे रंगवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT