मुंबई

पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग

CD

पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग
मतदार याद्या सुधारणा कार्यक्रमाला सुरूवात
पनवेल ता.२३ (बातमीदार)ः महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभागनिहाय प्रारंभिक मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीबद्दलच्या हरकती व दुरुस्तीसाठी सुधारणा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
प्रारुप मतदार याद्यांवर कोणाच्या हरकती अगर सूचना असल्यास त्या प्राधिकृत अधिकारी यांचे नावे सर्व संबंधित प्रभाग कार्यालय, पनवेल पालिका मुख्यालय येथे २० ते २७ नोव्हेंबर अखेर कार्यालयीन वेळेत दाखल करता येतील. हरकती व सूचना सादर करण्याचे विहित नमुने पनवेल पालिका मुख्यालय, तसेच प्रभाग समिती कार्यालये, पालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
़़़़़़ः------------------------
मतदारांपुढे आव्हाने
पनवेल महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे दिसून आले होते. मतदार याद्यांमध्ये एका प्रभागातील लोकांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात नोंदवण्यात आली आहेत. तर एकाच घरातील चार सदस्यांपैकी दोघे एका प्रभागात, तर उर्वरित दोघे वेगळ्या प्रभागात असल्याने मतपुढे परिस्थिती निर्माण झाली आहे.
़़़़़़़ः--------------------------
‘या’ प्रभागांमध्ये गोंधळ
पनवेल महापालिकेतील प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत उप विभाग नावडे मध्ये १,२, ३ प्रभाग, प्रभाग समिती ‘अ’ कार्यालय, खारघर मध्ये ४,५,६ प्रभाग, प्रभाग समिती, कळंबोली मध्ये ७,८,९,१० प्रभाग, प्रभाग समिती ‘क’ कामोठेमध्ये ११,१२,१३ प्रभाग, तर प्रभाग समिती ‘ड’ पनवेलमध्ये १४,१५,१६,१७,१८,१९,२० प्रभाग असून त्यांची मतदार यादी निरीक्षणासाठी ठेवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

Google Investment : गुगल भारतात १.३५ लाख कोटींची गुंतवणूक करणार ; अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार

Property Tax : मिळकतकरात वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT