मुंबई

अंबरनाथमध्ये भाजपचा ''डबल गेम''!

CD

अंबरनाथमध्ये भाजपचा ‘डबल गेम’!
सुजाता गायकवाड यांचे काँग्रेसला समर्थन; फसवणुकीचा आरोप
अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : अंबरनाथच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुजाता गायकवाड यांनी भाजपवर फसवणुकीचा गंभीर आरोप करीत थेट काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर समर्थन दिले आहे. पक्षाने एकाच प्रभागात दोन उमेदवारांना एबी फॉर्म देऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप गायकवाड यांनी कोहोज गाव येथे शनिवारी (ता. २२) झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

सुजाता गायकवाड यांना भाजपने चिंचपाडा प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी दिली होती; मात्र याच प्रभागात भाजपने नरेंद्र राव कंचना यांनादेखील एबी फॉर्म दिला होता. अर्ज पडताळणीत दोन्ही अर्ज वैद्य ठरले होते. त्यामुळे सुजाता गायकवाड यांनी आरोप केला, की पक्षाने दुसऱ्या उमेदवाराबद्दलची माहिती आपल्यापासून हेतुपुरस्सर लपवून ठेवली आणि आपली फसवणूक केली. तसेच स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भाजपने फसवणूक केल्यामुळे संतप्त झालेल्या सुजाता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले, की त्या आता काँग्रेसचे उमेदवार कबीर गायकवाड यांना समर्थन देत आहेत. काँग्रेसचे उमेदवार कबीर गायकवाड यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत आपल्या पक्षाला मोठे पाठबळ मिळाल्याचे घोषित केले. भाजपने एका प्रभागात दोन एबी फॉर्म देऊन खेळलेल्या या राजकीय खेळीची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे कबीर गायकवाड आणि चरण रसाळ पाटील यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आरोप
सुजाता गायकवाड यांनी या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही आपल्यापासून माहिती लपवली असल्याचा गंभीर आरोप केला. यावर निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले, की भारतीय जनता पक्षाने दोन उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे (नामांकन अर्ज) दिले होते. कायदेशीर तरतुदीनुसार ज्या उमेदवारांचा पहिला अर्ज येतो तो वैध ठरवला जातो. दुसरा उमेदवार असतो त्याचे पाच सूचक असल्यास तो अपक्ष ठरवला जातो. शर्मा यांनी पुढे सांगितले, की सुजाता गायकवाड यांचा एकच सूचक असल्याने त्यांचा नामनिर्देशन अर्ज बाद ठरविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT