मुंबई

अखेर त्या कर्मचाऱ्यांना मिळाले थकीत वेतन

CD

अखेर कर्मचाऱ्यांचे ‘आपला दवाखाना’मधील थकीत वेतन जमा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिकेने ४० ठिकाणी सुरू केलेल्या ‘आपला दवाखाना’ उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आणि परिचारिकांचा तीन महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी केलेली आक्रमक मागणी आणि पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.
कंत्राटदार कंपनीने ऑक्टोबरपर्यंत मुदत असताना ऑगस्टमध्येच दवाखाने बंद केल्याने कर्मचारी बेरोजगार झाले होते आणि त्यांचा पगारही रखडला होता. कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. केळकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंपनीला दंड लावून कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित अदा करण्याची मागणी केली होती. तसेच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. अखेर रखडलेले तीन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी केळकर यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT