मुंबई

एका लोहमार्ग पोलिसाच्या खांद्यावर ५ हजार प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी

CD

ठाणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा वाऱ्यावर!
१९९२ च्या मंजूर पदांवर पाच हजार प्रवाशांचा भार
ठाणे, ता. २३ : ठाणे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिस ठाण्यात असलेले मनुष्यबळ अत्यंत अपुरे ठरत आहे. प्रवाशांच्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढली नसल्याने, एका पोलिसाच्या खांद्यावर तब्बल पाच ते सहा हजार प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी ये-जा करतात. १९९२ साली पोलिस ठाण्याची निर्मिती झाली, तेव्हा मंजूर झालेल्या पदांवरच आजही सुरक्षेचा गाडा हाकला जात आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याची हद्द ठाण्यापासून दिवा, कळंबोली आणि हार्बरवरील दिघा स्थानकांपर्यंत पसरली आहे. मनुष्यबळ वाढवण्याची मागणी वारंवार करूनही पदे वाढलेली नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊन पोलिस कर्मचारी जबाबदारीच्या ओझ्याखाली भरडले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


सुरक्षा फौजेचा तपशील
संख्यामंजूर अधिकारी : ८
मंजूर पोलीस कर्मचारी : १६०
उपलब्ध होमगार्ड : १०० (अस्थिर उपस्थिती)
ठाणे स्थानकात शिफ्टनुसार कर्मचारी : दोन शिफ्टमध्ये अंदाजे १५ पोलीस

सुरक्षा साधनांचा अभाव
रेल्वे स्थानकात आवश्यक असलेल्या सुरक्षा भिंतीची कमतरता आहे. प्रवाशांच्या तपासणीसाठी मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर मशीनचा अभाव प्रामुख्याने दिसतो. त्याचप्रमाणे कमी मनुष्यबळामुळे गर्दीच्या वेळी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ठाणे स्थानकात वळवावे लागते. कमी कर्मचाऱ्यांमध्ये दिवस ढकलावा लागत असल्याची खंत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT