मुंबई

विजयनगर येथे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

CD

विजयनगर येथे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
कल्याण, ता.२३ (बातमीदार) : माजी नगरसेविका माधुरी काळे यांच्या माध्यमातून विजयनगर येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत विजयनगर, आमराई व चिंचपाडा रोड परिसरातील शेकडो नागरिकांनी आयोजित शिबिराचा दिवसभरात लाभ घेत विविध तपासण्या करून घेतल्या.
रक्तदाब, शुगर, हृदयाची ईसीजी चाचणी, एमआरआय सिटी स्कॅन, डोळे तपासणी मोफतपणे करून देण्यात आली. तर अल्प दरात चष्मेही जागेवरच उपलब्ध करून देण्यात आले. याखेरीज स्त्रियांच्या विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. मोफत तपासणीसह अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कॅन्सर शस्त्रक्रिया, मोतिबिंदू, डायलिसिस, हाडांचे फ्रॅक्चर, हर्निया आदी मोफत शस्त्रक्रियाच्या नोंदणी साठीही असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. आयोजित उपक्रमास विभाग समन्वयक महेंद्र एटमे, भारती एटमे, गुंफा आत्राम, श्रीधर कोळेकर, डोंगरे आदी शिवसैनिकांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT