मुंबई

विद्यार्थ्यांचा लोकशाहीसाठी ‘मतदान संदेश’

CD

विद्यार्थ्यांचा लोकशाहीसाठी ‘मतदान संदेश’
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : बदलापूर पूर्व जुनी नगरपालिका परिसर, स्टेशन चौक आणि पूर्व-पश्चिम भागात आदर्श विद्यामंदिर इंग्लिश माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. २२) पथनाट्य व प्रभात फेरी काढत मतदानाबाबत जनजागृती केली. आगामी २ डिसेंबर रोजी होणारे कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मतदान आणि ३ डिसेंबरची मतमोजणी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सकाळी घोषणाबाजी, फलक आणि प्रभावी संवादांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. शहरातील विविध चौकात सादर झालेल्या पथनाट्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फुगा बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम शहरात राबविण्यात आला. बदलापूर शहरातील तब्बल दोन लाख २५ हजार मतदारांपैकी मागील काही वर्षांपासून केवळ ५० टक्के इतकेच मतदान होत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. “लोकशाहीचा हा उत्सव सर्वांनी साजरा करा”, “प्रत्येक मत महत्त्वाचे आहे”, अशा घोषणांतून दोन लाख २५ हजार मतदारांनी यंदा शंभरी पार मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीकडून दिल्या गेलेल्या या जागृती संदेशामुळे शहरातील मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

Daughter-in-law Legal Duty India : सुनेने सासू-सासऱ्यांची सेवा केली नाही तर गुन्हा दाखल होतो ? हायकोर्टाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : अंधेरी लोखंडवाला परिसरात महिलेचा चैन चोरी करणाऱ्या सराईत साखळी चोराला अवघ्या ५ तासात अटक

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT