मुंबई

बेलापूर-पनवेल ब्लॉक वेळेपेक्षा लांबला : लोकल सेवा तब्बल १४ तास बंद

CD

मेगाब्लॉक लांबल्याने
‘हार्बर’वासीयांचे हाल
पनवेल-बेलापूर लोकल सेवा १४ तास बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः पनवेल ते बेलापूरदरम्यान शनिवारी (ता. २२) रात्रीपासून रविवार (ता. २३) दुपारपर्यंत १२ तासांचा मेगाब्लॉक दोन तास वाढला. जवळपास १४ तास लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच्या अभियांत्रिकी कामांसाठी पनवेल ते बेलापूरदरम्यान शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी सकाळी ११.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक नियोजित होता; परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने ब्लॉकची वेळ दोन तासांनी वाढवावी लागली. सुमारे १.५४ काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तपासण्या व सुरक्षितता पडताळणी पूर्ण करून दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी बेलापूर ते पनवेल लोकल सेवा सुरू करण्यात आल्या.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी मेगाब्लॉकच्या वेळापत्रकानुसार बाहेर जाण्याचे नियोजन केले होते; मात्र ब्लॉकचा कालावधी वाढल्याने हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. अखेर अनेकांना बस, ऑटो-रिक्षा, कॅब किंवा खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागला. दरम्यान, प्रवाशांच्या सोईसाठी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने बेलापूर रेल्वेस्थानक ते पनवेलदरम्यान  ४० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात आल्या. मेगाब्लॉकनंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.  
---
 ब्लॉकदरम्यान मोठी कामे पूर्ण
ब्लॉकदरम्यान पनवेल यार्ड रिमोल्डिंगचा भाग असलेला पॉइंट ५१५-ए हटवणे, मुख्य लाइन ट्रॅक नव्या पीएससी स्लीपरसह जोडणे, स्वीचेस-क्रॉसिंग बसवणे, बॅलास्ट टाकणे आणि ट्रॅक टॅम्पिंगची कामे करण्यात आली. ओएचईचे अंतिम समायोजन, इन्स्युलेटर- ओव्हरलॅप अ‍ॅडजस्टमेंट आणि ट्रॅक सर्किट चाचण्या पूर्ण केल्या.  फलाट क्रमांक दोनच्या सीएसएमटीकडील बाजूचा पॉइंट ५१५-ए सुमारे ९० मीटर पुढे हलवण्यात आला. त्यामुळे पनवेल येथील फलाटाचे ९०  मीटरपर्यंत विस्तार करणे शक्य होणार आहे. आगामी पनवेल-कर्जत कॉरिडॉरच्या प्लॅटफॉर्मसाठी हे काम आवश्यक होते.
---
रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
एमआरव्हीसीमार्फत सुरू असलेल्या सुधारणा आणि अभियांत्रिकी कामांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असून ते निर्धारित मानकांनुसार पूर्ण करणे अनिवार्य होते. काही तांत्रिक कारणांमुळे कामांना अधिक वेळ लागला, त्यामुळे ब्लॉक वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Well Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 70 फूट खोल विहिरीत 25 टन वजनाचे पोकलँड कोसळले; विहिरीत बुडणाऱ्या मित्रासाठी ऑपरेटरने..., VIDEO पाहा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी संतापल्या! केवायसी करूनही मिळेनात पैसे; पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांत हेलपाटे..

तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

Pune News: सांत्वन नको; आम्हाला ठोस मदत करा; दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

SCROLL FOR NEXT