मुंबई

भुयारी मेट्रोत दिव्यांगांना पासवर २५ टक्के सवलत

CD

भुयारी मेट्रोत दिव्यांगांना पासवर २५ टक्के सवलत
‘सकाळ’च्या वृत्तानंतर सेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मेट्रो-३ आरे-कफ परेड भुयारी मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मासिक पासवर २५ टक्क्यांची सवलत आजपासून सुरू झाली आहे. सध्या ही सुविधा आयओएस (ॲपल)च्या वापरकर्त्यांना मेट्रो कनेक्ट-३ ॲपवर उपलब्ध झाली असून, लवकरच अँड्रॉइडच्या वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरे-कफ परेड ही सुमारे ३३ किलोमीटर लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका ९ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने सेवेत आली आहे. त्याला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे दीड लाख प्रवासी ये-जा करीत आहेत. दरम्यान, मुंबईत दिव्यांगांची मोठी संख्या असून त्यांना एसटी, बेस्टमध्ये सवलत आहे. इतर ठिकाणीही सवलतीमध्ये वेगवगेळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची दखल घेत एमएमआरसीने २८ ऑक्टोबरला समाजमाध्यम ‘एक्स’वरून दिव्यांगांना मेट्रोच्या मासिक पासामध्ये २५ टक्के सवलत १० दिवसांत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र २० दिवसांनंतरही ही सवलत सुरू झाली नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत एमएमआरसीएलने तत्काळ ही सेवा सुरू केली आहे. सध्या ही सुविधा आयओएस (ॲपल)च्या वापरकर्त्यांना मेट्रो कनेक्ट-३ ॲपवर उपलब्ध झाली आहे, तर अँड्रॉइडच्या वापरकर्त्यांना ही सुविधा मिळावी म्हणून गुगलकडे प्रस्ताव पाठवला असून, त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर अँड्राॅइडमध्ये सेवा उपलब्ध होणार असल्याचे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ही सवलत एनसीएमसी कार्डवरही लवकरच मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT