२२ बोगस मतदारांवर पडदा
पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस मतदार, यादीतील घोळ, मत चोरीच्या संशयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच २०२१ साली बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बनावट वीज देयके कागदपत्रांच्या आधारे २२ बोगस मतदारांचे नावे घुसवण्याचे प्रकरण चर्चेत आले. मात्र, प्रकरणात एकही आरोपी सापडला नसल्याने पोलिसांना न्यायालयात कायम तपासावर असल्याचा अहवाल दिला आहे.
बेलापूर विधानसभा मतदार संघातील बोगस मतदार प्रकरण अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आले होते. १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या संक्षिप्त पुनर्रिक्षणावेळी २९ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑनलाइन मतदार नोंदणीसाठीच्या अर्जांची अधिकाऱ्यांनी बारकाईने पडताळणी केली. त्यात २२ अर्जांमधील विद्युत देयकात विसंगती आढळून आली होती. या देयकांच्या पडताळणीनंतर बोगस मतदारांचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात सीबीडी पोलिस ठाण्यात २२ जणामविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नाही.
---------------------------
‘ए-समरी’म्हणजे काय?
या प्रकरणातील एकही आरोपी चार वर्षे उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी बेलापूर न्यायालयात ए-समरी रिपोर्ट सादर केला आहे, म्हणजेच ‘गुन्हा घडला आहे; मात्र आरोपी मिळाला नाही’ प्रकरण कायम तपासावर, अशी नोंद केली आहे. पण मतदार यादीत बोगस नाव घालण्याचा हा प्रयत्न अत्यंत गंभीर असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
------------------------------
मतदार याद्यांबाबत साशंकता
राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करून अर्ज करता येते. त्यानंतर बीएलओ प्रत्यक्ष पडताळणी करतात. परंतु, कागदपत्रे बनावट असल्याचे उशिरा लक्षात येते, अर्जदारांचा पत्ता खोटा किंवा तात्पुरता असतो, अर्जदार प्रत्यक्ष ठिकाणी आढळतच नाही. यामुळे अशा प्रकरणांचा तपास ‘बनावट नाव, बनावट पत्ता, बनावट ओळख’ अडकतो.
--------------------------------
मतदार यादीत २२ बोगस नावे घालण्याचा प्रयत्न म्हणजे निवडणूक प्रक्रियेवरचा थेट हल्ला आहे. पोलिसांनी ए-समरी दाखल करणे म्हणजे तपासात गंभीर त्रुटी झाल्याचे स्पष्ट होते. बोगस नावांचा राजकीय फायदा कोणाला झाला, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
- पुनम पाटील, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई काँग्रेस
---------------------
२०२१ मध्ये बोगस दस्तऐवजांचा वापर करून २२ लोकांनी मतदार यादीत प्रवेशाचा प्रयत्न झाला. चार वर्षांनंतर एकही व्यक्ती सापडत नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे. यंत्रणेमधील तांत्रिक व मानवी त्रुटींचा फायदा घेऊन मतदार यादीत फेरफार लोकशाहीला घातक आहेत.
- सुधीर दाणी, प्रवर्तक, सजग नागरिक मंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.