मुंबई

स्व. प. म. राऊत यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

CD

स्व. प. म. राऊत यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार
भव्य सोहळ्यात शैक्षणिक कार्याचा सन्मान
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे गुरुवर्य शिक्षणमहर्षी स्व. प. म. राऊत यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या विलक्षण शैक्षणिक कार्याचा गौरव शनिवारी (ता. २२) रवींद्र नाट्य मंदिर येथे एका भव्य समारंभात करण्यात आला. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने आयोजित या मानाच्या सोहळ्याचे संयोजन कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. विशाल कडणे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले.
कार्यक्रमाला अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार अमित साटम, महाराष्ट्र भूषण पद्मश्री व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रसिद्ध संगीतकार अनू मलिक, नवोदित अभिनेता अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी उपस्थित राहून राऊत सरांच्या कार्याला कृतज्ञतेने अभिवादन केले. या मानाच्या पुरस्काराचे प्रदान आमदार अमित साटम व अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विश्वस्त माधवी नांदोस्कर आणि सचिव डॉ. विनय राऊत यांनी स्वीकारला. या क्षणी उपस्थितांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा भाव उमटला.
गुरुवर्य राऊत सरांनी स्थापन केलेल्या महामुंबई शिक्षण संस्था संघटनेद्वारे शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना एकत्र बांधून त्यांना भक्कम संघटनात्मक शक्ती प्रदान करण्याचे अतुलनीय कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची उपस्थित सर्वांनी उभे राहून कृतज्ञतेने दखल घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Gas Cylinder Shortage: बीडमध्ये घरगुती-व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; ग्राहक रांगेत; साठा असूनही गॅस नाही

Latest Marathi News Live Update : ओडिशात आगीत दहा रुग्णांचा मृत्‍यू

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

Pandharpur News: पंढरपुरातील इस्काॅन मंदिरात प्रसादासाठी पेटल्या चुली; अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका, भाविकांच्या भोजनावर मर्यादा!

Beed Road Construction Issue: रस्ता कामाला अडथळ्यांचा फेरा; बीडमध्ये चौपदरीकरणाचा वेग मंदावला; खोदकाम, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT