मुंबई

पापणीच्या पंखाखाली काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार

CD

‘पापणीच्या पंखाखाली’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
विरार, ता. २४ (बातमीदार) : युवा कवयित्री श्रुती रसाळ यांच्या ‘पापणीच्या पंखाखाली’ या मुक्तछंदातील प्रेम कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २२) विरार येथे ‘साहित्य चावडी’च्या ७५व्या पुष्पांतर्गत मोठ्या उत्साहात पार पडला. या संग्रहाला ज्येष्ठ लेखक व नाटककार गंगाराम गवाणकर यांनी आपली अखेरची प्रस्तावना दिली आहे, ज्यामुळे या संग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
माजी आमदार हितेंद्र ठाकूर, अभिनेते-लेखक प्रदीप कबरे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. गणेश चंदनशिवे आणि डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिनेते प्रदीप कबरे यांनी कवितांमधील अर्थ, लय आणि कवयित्रीच्या अंतर्मनाचा ध्वनी यांचे विशेष कौतुक केले. प्राध्यापिका कविता पाटील यांनी, या कविता वाचकांना पहिले प्रेम आठवून देतील, असे सांगितले. अत्यंत लहान वयात श्रुती रसाळ यांनी साहित्याच्या विश्वात यशस्वी पदार्पण केल्यामुळे हा संग्रह वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
दुसऱ्या सत्रात विडंबन काव्य संध्या पार पडली, ज्यात अनेक विडंबन कविता सादर झाल्या. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईन २०१७ मध्ये कार्यान्वित झाली

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT