मुंबई

न्यायासाठी आता जनतेच्याच न्यायालयात फिर्याद - खुशनुमा शेख

CD

आता जनतेच्याच न्यायालयात फिर्याद
जमील शेख यांच्या पत्नीची शरद पवारांच्या पक्षातून उमेदवारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : सरकार, पोलिस यांच्याकडून न्याय मिळत नसल्यानेच आपण जनतेच्या न्यायालयात फिर्याद करीत असल्याची प्रतिक्रिया जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी दिली. ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला रविवारी (ता. २३) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनीच त्यांची पत्नी खुशनुमा शेख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. या वेळी त्या बोलत होत्या. शेख यांना न्याय द्यायचा असेल तर खुशनुमा शेख यांना विजयी करणे आपली जबाबदारी आहे, असे याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी २३ नोव्हेंबरला राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली. यासंदर्भात विधिमंडळातही चर्चा झाली असून, चौकशीचे आदेश देऊनही तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आगामी निवडणूक लढविण्याचा निर्धार खुशनुमा शेख यांनी व्यक्त केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी जोबिया, जमील सुलेमानी, जतीन कोठारे, मकसूद खान, राजेश साटम, सचिन पंधरे आदी उपस्थित होते.
खुशनुमा शेख यांनी सांगितले, की जमील यांच्यावर आधीही हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी जमील यांनी हा हल्ला नजीब मुल्ला यांनीच केला होता. नजीब मुल्ला आपणाला ठार मारतील, असा जबाब पोलिसांना दिला होता. जमील शेख यांचा मारेकरी ओसामा यानेही मुल्ला यांचे नाव घेतले आहे. दरम्यान, मनोज प्रधान यांनी खुशनुमा शेख या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात आल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले.

मला खोट्या आरोपामध्ये अडकविण्याचा प्रयत्न ः मुल्ला
मला खालच्या पातळीवर जायचे नाही. नजीबला पराभूत करू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मला खोट्या आरोपांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. जेव्हा जेव्हा मी मुंब्र्यात जातो तेव्हा जमील हत्याकांड प्रकरण बाहेर येते, अशी टीकादेखील नजीब मुल्ला यांनी केली. राबोडीची जनता हुशार आहे. मी काम केले असेल तर जनता स्वीकारेल, नसेल तर नाकारेल. जो उमेदवार द्यायचा तो माझ्यासमोर उभा करा, असा थेट इशारा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT