मुंबई

दिमाखदार सोहळ्यात कामोठा महोत्सवाची सांगता

CD

दिमाखदार सोहळ्यात कामोठा महोत्सवाची सांगता
१० दिवसांत लाखो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती; सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद
पनवेल, ता. २४ (बातमीदार) : कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कामोठा महोत्सवाची भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी सांगता झाली. १० दिवस चाललेल्या या सांस्कृतिक महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, लाखो नागरिकांनी विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आयोजित सांगता सोहळ्यात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले प्रसिद्ध धवला गीतकार अवनी पाटील यांनी सादर केलेले धवलागीतांचे प्रभावी सादरीकरण. त्यांच्या सुरेल आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे जोरदार स्वागत केले. या प्रसंगी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेवक विकास घरत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी आपल्या भाषणात अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मतेची भावना निर्माण होते आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते, असे मत व्यक्त केले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी अशोक पावणेकर, जगदीश पावणेकर, विशाल पावणेकर, विशाल बेलकर, सुमीत गोवारी, अमोल कड, प्रशांत कुंभार, सोहन मुकादम, तुषार हिरवे आणि राकेश बारसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक जय पावणेकर यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कामोठा महोत्सवामुळे परिसरातील सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, पुढील वर्षी हा महोत्सव आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT