मुंबई

निवडणूक वादातून दोन गटांत हाणामारी

CD

तारापूर, ता. २४ (बातमीदार) : बोईसरजवळील परनाळी परिसरात साने गुरुजी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान उसळलेल्या वादातून रविवारी (ता. २३) दुपारी दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत दोन्ही गटांतील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी तारापूर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय वाघोबा देव सहकार पॅनलचे उमेदवार दिनेश मातेरा यांच्यावर समोरच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या उमेदवाराला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिस तक्रारीमध्ये म्हणण्यात आले आहे. या प्रकरणी संजय पिंपळे, कुंदन संखे, दिपेश पिंपळे, मोहित दत्तात्रय संखे, अरविंद संखे, प्रमोद पिंपळे, दत्तात्रेय संखे आणि विपुल पिंपळे यांच्याविरोधात रविवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून संशयितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT