मुंबई

‘आयएनएस माहे’ नौदलात दाखल

CD

‘आयएनएस माहे’ नौदलात दाखल
स्वदेशी बनावटीची या श्रेणीतील पहिली युद्धनौका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : भारतीय नौदलाच्या तटीय सुरक्षेला नवे बळ देणारी आणि पाणबुडीविरोधी कारवायांसाठी खास तयार केलेली स्वदेशी शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस माहे सोमवारी (ता. २४) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलात दाखल झाली. पश्चिम नौदल कमांडतर्फे आयोजित समारंभात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली  या युद्धनौकेचे कमिशनिंग करण्यात आले.
आकाराने लहान असली तरी आयएनएस माहेची क्षमता अत्यंत प्रभावी आहे. किनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यातही ती वेगाने आणि चपळाईने हलू शकते. पाणबुड्या शोधणे व नष्ट करणे, तटीय गस्त, समुद्री मार्गांचे संरक्षण आणि तातडीच्या कारवायांना प्रतिसाद देणे, ही तिची प्रमुख कामे असणार आहेत. तटवर्ती सुरक्षेत ती निर्णायक भूमिका निभावेल. या युद्धनौकेच्या बांधणीत तब्बल ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणे वापरण्यात आली आहेत. डिझाइन, नेव्हिगेशन प्रणाली, सेन्सर्स आणि शस्त्रसज्जता भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असल्याने ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. जहाजाचे नाव मलबार किनाऱ्यावरील ऐतिहासिक माहे गावावरून देण्यात आले आहे. अधिकृत चिन्हात ‘उरुमी’ या कलारीपटूतील लवचिक तलवारीचे चित्र असून ते जहाजाची गती, अचूकता आणि प्रहारक्षमता दाखवते.
...
माहे-श्रेणीतील पहिली नौका
कोचीतील कोचीन शिपयार्डमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आठ जहाजांच्या या मालिकेतील आयएनएस माहे ही पहिली नौका आहे. बेल, एल अँड टी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स आणि देशातील २०हून अधिक सूक्ष्म उद्योगांनी या प्रकल्पात सक्रिय सहभाग घेतला आहे.
...
पाणबुडीविरोधी मोहिमेसाठी तत्पर
उथळ पाण्यात पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी या जहाजाची रचना खास करण्यात आली आहे. अचूक सेन्सर्स, प्रगत शस्त्रसज्जता आणि आधुनिक नियंत्रण व्यवस्था यामुळे ती सतत व दीर्घकाळ गस्त ठेवू शकते. किनारी सुरक्षेची पहिली भिंत अधिक मजबूत करण्यात आयएनएस माहे प्रभावी योगदान देणार आहे.
..
एकत्रित शक्तीचाच काळ
दाखल समारंभावेळी जनरल द्विवेदी म्हणाले, की आयएनएस माहेच्या समावेशाने नौदलाची ताकद वाढेल आणि स्वदेशी युद्धनौका बांधण्याची भारताची क्षमता अधिक बळकट होईल. भावी संघर्ष बहुआयामी असतील आणि तीनही दलांमधील समन्वय निर्णायक ठरेल.  सशस्त्र दलांची सर्वांत मोठी ताकद म्हणजे समन्वय. ऑपरेशन सिंदूर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी नमूद केले.
...
समुद्रावर सतत पहारा
माहे-श्रेणीची जहाजे मोठ्या युद्धनौका, पाणबुड्या आणि हवाई तुकड्यांसह समन्वय साधून किनाऱ्यालगतच्या समुद्रावर सतत लक्ष ठेवतील. यामुळे नौदलाची सज्जता, प्रतिसाद क्षमता आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे.
...
आयएनएस माहेची भूमिका
- पाणबुडी शोध व कारवाई
- किनारपट्टी गस्त
- समुद्री मार्गांचे संरक्षण
- तातडीची तटीय प्रतिसाद मोहीम
...
वैशिष्ट्ये अशी...
- ८० टक्के  स्वदेशी घटक
- कमी पाणलोटातही वेगवान हालचाल
- अत्याधुनिक सेन्सर्स व नेव्हिगेशन
- आधुनिक शस्त्रसज्जता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT