मुंबई

मुंबईत ४९वे गुणीदास संगीत संमेलन

CD

मुंबईत ४९वे गुणीदास संगीत संमेलन
महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबईतर्फे आयोजन
मुंबई, ता. २४ : महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबईतर्फे ४९व्या गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार (ता. २७) ते रविवार (ता. ३०) या चार दिवसांत रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे सादर होणार आहे. गेली ४९ वर्षे गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबईतर्फे केले जाते. पुढच्या वर्षी संमेलनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
यंदाच्या गुणीदास संगीत संमेलनाची सुरुवात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ७ वाजता प्रख्यात गायिका कोशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने होणार आहे. संतूरवादक पंडित सतीश व्यास यांच्या संतूर वादनाने पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सांगता होईल. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता तौफिक कुरेशी जेम्बे आणि योगेश समसी तबला आपल्या जुगलबंदीने कै. उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहतील. पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल. शनिवार (ता. २९) सायंकाळी ७ वाजता शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाने सुरू होईल. पद्मभूषण, व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाने तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. रविवार (ता. ३०) सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांच्या गायनाने होणार आहे. या संमेलनाची सांगता जगप्रसिद्ध, सरोद सम्राट, पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने होणार आहे.
---------
माझे वडील कै. पंडित सी. आर. व्यास यांनी १९७७ला या संमेलनाची सुरुवात केली. महाराष्ट्र ललित कला निधी या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी आग्रा घराण्याचे महान गायक कै. पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या स्मृतिनिमित्त हे संगीत संमेलन सादर केले जाते. कै. पंडित जगन्नाथ बुवा हे फक्त लोकप्रिय महान गायक नव्हते, तर ते शिष्यप्रिय गुरू होते. त्यांनी ‘गुणीदास’ या टोपण नावाने अनेक बंदिशी बांधल्या आणि रागांची निर्मिती केली आहे. म्हणूनच हे संमेलन ‘गुणीदास संगीत संमेलन’ या नावाने गेली अनेक वर्षे आयोजित केले जाते.
- पंडित सतीश व्यास, प्रसिद्ध संतूरवादक, अध्यक्ष, महाराष्ट्र ललित कला निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT