मुंबई

विद्यार्थ्यांना ‘स्त्री सुरक्षा व उपाययोजना’वर मार्गदर्शन

CD

मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : शांतारामभाऊ घोलप व गोटीरामभाऊ महाविद्यालय, शिवळे येथे सोमवारी (ता. २४) ‘लिंगभाव, लैंगिक छळ व उपाययोजना’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. महिला विकास कक्ष व अंतर्गत तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी योगिता देसले यांनी सादर केलेल्या ‘ईश्वर वंदने’ने वातावरण भक्तिमय झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष प्रमुख व उपप्राचार्या डॉ. गीता विशे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक ॲड. रेखा चिरनेरकर (कल्याण) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘लिंगभाव व लैंगिक अत्याचार’ या विषयातील मूलभूत फरक स्पष्ट केला. समाजात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना, त्याची कारणे आणि त्याचे गंभीर परिणाम यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे लैंगिक अत्याचाराचे मानसिक, सामाजिक व कायदेशीर दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. बडगुजर होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली व समाजाची सुरक्षितता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगून सजगतेचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन स्नेहा तारे यांनी केले, तर आभार प्रा. प्रिया भगत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मीना सुतवणी व राजश्री घुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT