मुंबई

वरळीतील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देणार

CD

वरळीतील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देणार

मुंबई, ता. २४ : अनेक वर्षे न्यायालयीन वादात अडकलेला वरळीतील सी. एस. क्रमांक २२० हा सार्वजनिक आरक्षणाखालील भूखंड अखेर महापालिकेच्या ताब्यात आला आहे. त्यानंतर पालिकेने हा भूखंड पुढील ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सुमारे ३,५१८ चौ. मी. क्षेत्रफळ असलेल्या या जागेतील प्रत्यक्ष उपलब्ध जागा मात्र १,२९९.५२ चौ. मी. इतकीच असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आजूबाजूची आरक्षणे, ट्रॅफिक आयलंड व रायफल क्लबच्या अतिक्रमणामुळे उपलब्ध क्षेत्र कमी झाले आहे. विकास आराखडा २०३४नुसार हा भूखंड क्लब/जिमखाना या सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित आहे. महापालिकेच्या नियमांनुसार अशा सार्वजनिक आरक्षणाच्या जमिनींचा विकास, संचालन व देखभाल शासकीय अथवा इतर संस्थांकडे सोपवण्याची परवानगी असून, त्यानुसार हा भाडेपट्टा देण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला आहे. हा भूखंड सुरुवातीला व्हीएलटी तत्त्वावर देण्यात आला होता; मात्र न्यायालयीन प्रक्रियेत अडकत प्रकरण वर्षानुवर्षे प्रलंबित होते. शेवटी १५ ऑक्टोबर २०२४ला पालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या मालमत्ता अधिकाऱ्यांनी ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT