मुंबई

बहुसदस्य प्रभागात सावध राहा!

CD

बहुसदस्य प्रभागात सावध राहा!
खासदार नरेश म्हस्के यांचा कार्यकर्त्यांना इशारा
वाशी, ता. २५ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने सोमवारी (ता. २४) ऐरोली, बेलापूर परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बहुसदस्य प्रभागात समीकरणे क्षणात बदलत असल्याने सावध राहण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आगामी निवडणुकांमध्ये संघटित राहून लढण्याचे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबईत प्रथमच महापालिकेच्या निवडणुका बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होत असल्याने अनुभवी माजी नगरसेवकांसोबत नवख्या चेहऱ्यांनाही संधी उपलब्ध आहे; मात्र अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो, असा इशारा म्हस्के यांनी दिला. उमेदवार कितीही अनुभवी असला, तरी बहुसदस्य प्रभागात समीकरणे क्षणात बदलतात. त्यामुळे फाजील आत्मविश्वास नसावा. संघटनेत मतभेद झाले तरी फूट पडू देऊ नका. कोणाचे नाव वगळले असेल, तक चूक असेल किंवा अन्य काही आक्षेप असतील तर तत्काळ हरकती नोंदवा. त्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
-------------------------------------
युती धर्म पाळा
आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला सत्ता मिळवून देणे, याला प्राथमिकता आहे. पालिकेत भगवा फडकवायचा आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार युतीचा निर्णय झाला तर युती धर्म पाळावा लागेल, असे म्हस्के म्हणाले. या मार्गदर्शन बैठकीस शिवसेना निवडणूक प्रचार सचिव अनील भोर, जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश कदम, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हाप्रमुख सरोज पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT