मुंबई

समुपदेशन केंद्र ही काळाची गरज

CD

समुपदेशन केंद्र ही काळाची गरज ः अभिनव गोयल
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : समुपदेशन केंद्र ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सोमवारी (ता. २४) केले. पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आणि वूमन्स वेल्फेअर फाउंडेशन या एनजीओच्या मदतीने कल्याण पश्चिम येथील चिकणघर परिसरात उभारलेल्या समुपदेशन केंद्राचे उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.
शहरातील दुर्बल घटकांसाठी महापालिकेमार्फत विविध योजना राबविल्या जातात. मुली, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना घर, कार्यालय आदी ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्या मांडण्यासाठी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची माहिती अभिनव गोयल यांनी या वेळी दिली. आरोग्यदायी आणि संतुलित सोसायटीसाठी समुपदेशन केंद्राची मदत होणार असून या समुपदेशन केंद्राचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त कांचन गायकवाड, संजय जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, वैद्यकीय अधिकारी डॉ. टिके, डॉ. पौर्णिमा ढाके, समाजविकास अधिकारी प्रशांत गवाणकर, कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष कोसूळकर, इतर मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

समुपदेशक व कायदा सल्लागार
कल्याण पश्चिम येथील चिकणघर परिसराव्यतिरिक्त मोहन खेडा- मोहने, सप्तगिरी- कल्याण पूर्व, पेंडसे नगर- डोंबिवली पूर्व आणि आनंदनगर-डोंबिवली पश्चिम या परिसरातही समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत असून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता कल्याण व डोंबिवली विभागासाठी प्रत्येकी एका समुपदेशकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी या वेळी दिली. तर, केंद्रात एक समुपदेशक व आवश्यकतेनुसार कायदा सल्लागारचे सहकार्य नागरिकांसाठी उपलब्ध राहील, अशी माहिती वूमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी उज्जैनकर यांनी या कार्यक्रमात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

भररस्त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीला मारली कानशिलात, सोशल मीडियावर Viral Video

Thane News: मेट्रो प्रकल्पासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड, प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅस टंचाई; हॉटेलचालकांना लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करण्याची वेळ

SCROLL FOR NEXT