मुंबई

एकत्रित परिवहन सेवा कागदावरच

CD

एकत्रित परिवहन सेवा कागदावरच
दीड वर्षानंतरही केएमपीएमएलला मुहूर्त नाही
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रासाठी एकत्रित परिवहन सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने १४ मार्च २०२४ रोजी मंजुरी दिली होती. मात्र, दीड वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत एकही पाऊल न पडल्याने ही महत्त्वाकांक्षी योजना अद्याप कागदापुरतीच मर्यादित आहे.
राज्यातील अन्य शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस ताफा वाढविण्याचा वेग दिसत असताना, या परिसरासाठी मंजूर असलेल्या उर्वरित ई-बसच्या आगमनालाही ब्रेक लागला आहे. एकत्रित परिवहन सेवेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या केएमपीएमएल (कल्याण महानगर परिवहन महामंडळ) या नव्या संस्थेचे रजिस्ट्रेशनही अद्याप प्रलंबित असल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे.
सार्वजनिक परिवहनाची उपलब्धता कमी असल्याने शहरांमध्ये रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वातावरणातील प्रदूषणातही मोठी भर पडली आहे. केंद्र सरकारने पर्यायी उपाय म्हणून इलेक्ट्रिक बसला प्रोत्साहन दिले असून, मोठ्या ताफ्यातील ई-बस रस्त्यावर उतरल्यास प्रवाशांना स्वस्त, सुलभ आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा लाभ होऊ शकतो. मात्र, त्यासाठी एकत्रित परिवहन सेवा वेगाने सुरू होणे गरजेचे आहे.

१२ रेल्वे स्थानके जोडण्याची योजना कासव गतीने
सरकारच्या आराखड्यानुसार या सेवेअंतर्गत कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, आंबिवली, टिटवाळा आणि भिवंडी या १२ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना जोडणारे फिडर रुट सुरू करण्याची योजना होती. ही सेवा रिक्षा आणि रेल्वेला पूरक ठरण्याबरोबरच वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण प्रकल्प सरकारी अनुदानावर अवलंबून असल्याने प्रक्रियेचा वेग कासवाच्या गतीनेच पुढे जात आहे. वारंवार बैठका, कागदपत्रांची देवाणघेवाण आणि प्रशासकीय औपचारिकता; यापुरतेच सर्वकाही मर्यादित आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर बस धावण्याच्या दिशेने अद्याप कोणतीही ठोस कृती झालेली नाही.

परिसरातील बसची गरज आणि उपलब्धता
पालिका/नगरपरिषद लोकसंख्या आवश्यक बस उपलब्ध बस ई-बस मंजुरी
केडीएमसी १५,२०,००० ६०० १४१ ३०७
भिवंडी-निजामपूर७,४१,००० ३०० ० १२०
उल्हासनगर ५,४२,००० २२० २० १००
अंबरनाथ ३,००,००० १२० ० ०
कुळगाव-बदलापूर २,४०,००० १०० ० ०
एकूण ३३,४३,००० १३४० १६१ ५२७


बससेवेची प्रतीक्षाच
सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निर्णय प्रशासनाला प्रत्यक्षात उतरविता आलेला नाही. परिणामी, दोन वर्षांचा टप्पा जवळ आला असतानाही एकत्रित परिवहन सेवा अद्याप कागदावर, तर नागरिकांची स्वस्त, पर्यावरणपूरक आणि नियमित बससेवेची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. तल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांच्याशी मागील चार-पाच दिवसांपासून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी सतत बंद येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

Dombivali Crime : मी माझ्या बायकोची हत्या करून आलो, म्हणत स्वतःच पोलीस ठाण्यात हजर; पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT