मुंबई

पित्याच्या मदतीने लेकाने घातला आईच्या मैत्रिणीला गंडा

CD

पित्याच्या मदतीने लेकाने घातला आईच्या मैत्रिणीला गंडा
सकाळ वृतसेवा
ठाणे, ता. २५ : गावी ट्रेनने निघालेल्या ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेला तिच्या मैत्रिणीच्या पती आणि मुलाने गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या तक्रारीनुसार त्या बापलेकांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत त्या महिलेचे तब्बल एक लाख ३८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदार महिला आणि तिची मैत्रिण आणि तिचे पती असे तिघे प्रतापगड येथे गावी जाण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी तेथे ठाणे रेल्वे स्थानकात आले. गोदान एक्सप्रेस अकरा वाजण्याच्या सुमारास असल्याने ते फलाटवर गाडीची वाट बघत होते. त्यावेळी तक्रारदार यांच्या मैत्रिणीचा मुलगा तेथे आला. सुल्तानपूर जाण्यासाठी तीच गाडी पकडण्यासाठी आला असल्याचे त्याने सांगितले. गाडी फलाटावर आल्यावर तक्रारदारांची बॅग मुलगा काही न सांगता घेऊन जनरल डब्यात वडिलांसोबत चढला आणि तक्रारदार व त्यांची मैत्रिणी जनरल राखीव महिला डब्यात चढल्या. बॅगसाठी तक्रारदारने मुलाला वारंवार फोन करून आणून देण्यास सांगितले. शेवटी तक्रदारांच्या मैत्रिणीने मुलाला फोन केल्यानंतर त्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॅग आणून दिली. १९ नोव्हेंबर रोजी ते प्रयागराज रेल्वे स्थानकात उतरले. तक्रारदार प्रतापगड आणि ते तिघे सुल्तानपूर येथे जाण्यासाठी बसमध्ये बसले. तक्रारदार घरी पोहोचल्यानंतर बॅगेतील सोन्याचे दागिने मिळून आले नाही. यानंतर गावावरून आल्यावर त्यांनी थेट ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गाठत बापलेकांविरोधात चोरी तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT