नोकरीसाठी निवड होताच दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
वसई-विरारमध्ये रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
वसई ता. २५ ( बातमीदार) : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने वसई-विरार शहर महानगरपालिका आणि यूथ फोर जॉब्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दिव्यांग रोजगार मेळाव्यात अनेक दिव्यांग उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
या मेळाव्यात १२ हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कॅम्पस, अव्येनु, गुड फ्लिपिन इन बर्गर, सिला, मन, ॲमेझॉन, बिगबास्केट, शॉपर्स स्टॉप यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश होता. नोकरीच्या संधी शोधण्यासाठी २५० हून अधिक दिव्यांग उमेदवारांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. यात, ८२ हून अधिक दिव्यांग व्यक्तींची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. अस्थि दिव्यांगत्व तसेच श्रवण व वाचा दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीच्या संधी मिळाल्या. या मेळाव्यासाठी विवा कॉलेज विरार, अपंग कल्याणकारी संस्था आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार यांनी विशेष प्रयत्न केले. अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, उपायुक्त स्वाती देशपांडे आणि दीनदयाल अंत्योदय योजनेच्या शहर व्यवस्थापिका रुपाली कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भविष्यातही दिव्यांगांसाठी असे उपक्रम राबविले जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
-----------------
वसई-विरार महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दिव्यांग मेळाव्याचा मुख्य उद्देश, दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने नोकरी मिळवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा होता, जो यशस्वीरित्या पूर्ण झाला. अनेक उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे.
स्वाती देशपांडे - उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.