वसईत भूगर्भशास्त्रावर आगळेवेगळे प्रदर्शन!
विरार, ता. २५ (बातमीदार) : यंग स्टार्स ट्रस्ट, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आणि मध्य मुंबई मराठी विज्ञान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भूगर्भशास्त्र या विषयावर आधारित एक आगळेवेगळे प्रदर्शन “चला डोक्यात दगड भरुया” रविवारी (ता. ३०) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थी खडक, खनिजे आणि जीवाश्म वाचतात, पण प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक विषयाची आवड आणि संशोधनवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने डॉ. अभिजीत पाटील आणि डॉ. योगिता पाटील, कोल्हापूर यांची “चला डोक्यात दगड भरुया” ही संकल्पना आहे. प्रदर्शनात खडकांचे प्रकार, त्यातील दुर्मिळ नमुने, दैनंदिन वापरातील खनिजे तसेच विविध मूल्यवान धातू खनिजे, उपरत्ने, अभ्रक, टूर्मलिन आणि जीवाश्मांचा (अमोनाईट, बेलेमनाईट) समावेश असेल. या वेळी डॉ. पाटील स्वतः उपस्थित राहणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेता येईल. सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश वनमाळी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.