मुंबई

डहाणूत राजकीय वातावरण तापले

CD

डहाणूत राजकीय वातावरण तापले
कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता जोरात रंगला आहे. उमेदवारांच्या प्रचारमोहिमा, चौक सभा, रॅली, घर-घर भेटी आणि रात्रीच्या मुक्त बैठका यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदारांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेत भाजपला थेट आव्हान दिले होते. या सभेनंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २६) डहाणूत येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकीत अवघे काहीच दिवस शिल्लक असताना दोन्ही आघाड्यांचा जोरदार प्रचार पाहायला मिळत असून डहाणूतील राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT