मुंबई

बोर्डी गाव परिसरात बिबट्याचे दर्शन

CD

बोर्डी गाव परिसरात बिबट्याचे दर्शन

बोर्डी, ता. २५ (बातमीदार) ः बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील मरवाड भागामध्ये बिबट्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे सावधानता बाळगावी, असे आवाहन प्राणिमित्र सूर्यहास चौधरी व वन अधिकारी राजेश सारणीकर यांनी नागरिकांना केले आहे.
सोमवारी (ता. २४) सायंकाळी मरवाड परिसरात काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना, तसेच प्राणिमित्र सूर्यहास चौधरी यांना कळविताच घटनास्थळी वनखात्याची टीम रवाना झाली. परिसरात शोध घेतल्यानंतर बिबट्या आढळला नाही; परंतु पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्यास नागरिकांनी काळजी घ्यावी. लहान मुलांनी शक्यतो एकटे बाहेर पडू नये. मोठ्या माणसांनीदेखील सावधानता बाळगावी, असे आव्हान वन अधिकारी राजेश सारणीकर यांनी केले आहे. भरगच्च वस्तीमध्ये बिबट्याची दहशत वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT