मुंबई

केडीएमसी निवडणूक प्रभाग आरक्षणावर १२ हरकती

CD

निवडणूक प्रभाग आरक्षणावर १२ हरकती
अंतिम निर्णय आयुक्त घेणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या ३१ पॅनेलच्या प्रभाग आरक्षणावर एकूण १२ हरकती नोंदल्या गेल्या आहेत. हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (ता. २४) होती. आता प्राप्त सर्व हरकतींचा विचार करून त्यावर पालिका आयुक्त निर्णय घेणार असून, २ डिसेंबर रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
आरक्षणाची सोडत जाहीर होताच काही माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी विविध आक्षेप नोंदवले होते. लेखी स्वरूपात हरकती सादर करण्याची परवानगी दिल्यानंतर महापालिकेला १२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकतींपैकी प्रमुख आक्षेप पॅनेलमधील अ, ब, क आणि ड या अंतर्गत प्रभागांच्या सीमारेषा निश्चित नसणे हा आहे. पॅनेलची बाह्य सीमारेषा निश्चित केली असली तरी अंतर्गत प्रभाग कोणता अ, कोणता ब किंवा क-ड हे स्पष्टपणे नमूद नसल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे हरकतीत म्हटले आहे.
याशिवाय काही प्रभागांचे आरक्षण थेट पद्धतीने, तर काहींची चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. या वेगवेगळ्या पद्धतींमुळे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राधान्यक्रमानुसार अ, ब आणि क हे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे पॅनेलमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी केवळ क आणि ड हेच पर्याय शिल्लक राहतात. त्यामुळे इच्छुक सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची संधी कमी होत असल्याचे हरकतीत नमूद आहे.
दरम्यान, या आरक्षण प्रक्रियेवर शिंदे सेनेचे शहरप्रमुख रवि पाटील यांनीही हरकत नोंदवली आहे. हरकतींची योग्य दखल न घेतल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता आयुक्तांच्या निर्णयाकडे आणि २ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम प्रभाग आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT