मुंबई

खारघरमधील कांदळवनांवर डेब्रीजचा विळखा

CD

खारघरमधील कांदळवनांवर डेब्रिजचा विळखा
कारवाया थंडावल्याने माफियांना मोकळे रान
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ ः नैसर्गिक आपत्तींपासून किनारपट्टीचे संरक्षण करणाऱ्या कांदळवनांवर सध्या मोठा घाला सुरू असल्याचे चित्र नवी मुंबईतील खारघर परिसरात दिसून येत आहे. खाडीकिनारी पसरलेल्या मोकळ्या कांदळवन जागांवर सर्रासपणे माती, राडारोडा आणि बांधकाम साहित्यांचे ढिगारे टाकले जात आहेत. विशेषतः खारघर सेक्टर १८, सेक्टर १६, सेक्टर ३० तसेच तळोजा गावाच्या मागील भागात असलेली हिरवीगार कांदळवन क्षेत्रे हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
खारघर, कामोठे, तळोजा आणि रोडपाली हे परिसर पनवेल महापालिका आणि सिडको या दोन प्रशासनांच्या अखत्यारित येतात. या भागात मागील काही वर्षांत वेगाने नागरीकरण झाले असून, सिडकोमार्फत अनेक मोकळ्या भूखंडांवर उंच गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसेच खासगी विकसकांकडून मोठ्या प्रमाणावर इमारती आणि व्यावसायिक संकुले उभारली जात आहेत. या वाढत्या बांधकामांमुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक मोकळ्या जागा कमी झाल्या असून, कांदळवनांच्या परिसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. खारघरमधील संजीवनी शाळेसमोरील खाडीकिनारी भाग हा कांदळवनांनी समृद्ध परिसर म्हणून ओळखला जातो. या भागातून खाडीचे पाणी कामोठेमार्गे बेलापूरच्या दिशेने वाहते. बाजूलाच विस्तीर्ण पाणथळ क्षेत्र असून, ही जागा नैसर्गिक भरतीच्या पाण्याने नेहमीच पूरक असते; मात्र गेल्या काही दिवसांपासून या पाणथळ जागांमध्ये छोट्या टेम्पोच्या माध्यमातून थेट राडारोडा आणि डेब्रिज टाकले जात आहे. सुरुवातीला भरतीमुळे पाणी जास्त असल्याने या ठिकाणी वाहनांचा प्रवेश शक्य नव्हता; मात्र आता मोठ्या प्रमाणावर भराव टाकून थेट पाणथळ क्षेत्राच्या आत जाण्यासाठी रस्त्यासारखा मार्ग तयार करण्यात आला आहे. या जागांवर सिडको आणि महापालिकेचे नियंत्रण असले तरी कांदळवन संरक्षण विभागाचे कामकाज या ठिकाणी फारसे प्रभावी दिसून येत नाही. याचाच गैरफायदा घेऊन काही दलाल व तथाकथित भू-माफियांनी थेट कांदळवनांमध्ये रस्ते तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण खाडीकिनारी पसरलेली पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाची पाणथळ परिसंस्था आज गंभीर धोक्यात आली आहे.
................
यासंदर्भात तक्रारदार अमित सुद यांनी सांगितले, की खारघर भागातील कांदळवनांवर सातत्याने माती व डेब्रिज टाकले जात आहे. पाणथळ जागा आणि कांदळवने हळूहळू गायब होत आहेत. मी गेले अनेक दिवस फोटो काढून संबंधित यंत्रणांकडे तक्रार करत आहे; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान, रायगड कांदळवन विभागाचे आरएफओ कुलदीप पाटकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की खारघरमधील बराचसा भाग सिडकोच्या अखत्यारित येतो. त्यांच्या जागेवरील कांदळवनांबाबत कारवाई करण्याचे अधिकार सिडकोकडे आहेत. तरीदेखील कांदळवनांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास आमच्याकडून निश्चितपणे योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Kerala Minister Controversy : बेडरुममध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत मंत्री, पत्नीने रंगेहात पकडताच म्हणाला- माझे ५ हजार अफेअर्स, कुणी...

Pune : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर येताना दिसली, मागच्याने उडी मारली; दुचाकी चालकाला उडवलं, एकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : इराण–इस्रायल तणावाचा परिणाम? कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

SCROLL FOR NEXT