मुंबई

नियमबाह्य कांदा-बटाटा विक्रीवर होणार कारवाई

CD

नियमबाह्य कांदा-बटाटा विक्रीवर होणार कारवाई
एपीएमसीचे सचिव शरद जरे यांची स्पष्ट भूमिका
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) ः आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एपीएमसीचे सचिव शरद जरे यांनी दिला आहे. संबंधित नियमांचे उल्लंघन करून भाजीपाला मार्केटमध्ये कांदा व बटाट्याची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये कांदा-बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला व फळ अशा पाच स्वतंत्र बाजारपेठा कार्यरत आहेत. प्रत्येक कृषिमालासाठी स्वतंत्र बाजारपेठ निश्चित करण्यात आलेली असून, संबंधित मालाची विक्री त्या-त्या निश्चित ठिकाणीच होणे बंधनकारक आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला मार्केटमध्येच नियमबाह्यरीत्या कांदा-बटाटा विक्री सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे कांदा-बटाटा मार्केटमधील अधिकृत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली आहे. गरज भासल्यास न्यायालयीन मार्ग स्वीकारण्याची तयारीही या व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे.
सध्या भाजीपाला मार्केटमध्ये दररोज सुमारे ३० ते ४० ट्रक कांदा व बटाटा उतरवला जात असून, त्यातून अंदाजे ३०० ते ४०० टन म्हणजेच जवळपास २० हजार पिशव्यांची विक्री होत आहे. याचा थेट फटका कांदा-बटाटा स्वतंत्र बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना बसत असून, माथाडी कामगारांच्या हमालीचे उत्पन्न आणि बाजार समितीचा महसूलदेखील मोठ्या प्रमाणात बुडत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
..............
धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुलामध्ये कांदा-बटाटा विक्रीसाठी एपीएमसी कार्यालय, संचालक मंडळ किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करून भाजीपाला मार्केटमध्ये या मालाची विक्री सुरू असल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. यासंदर्भात कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापारी दिगंबर राऊत यांनी सांगितले, की आम्ही वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करीत आहोत. केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात अद्याप कारवाई झालेली नाही. हा विषय आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित करणार असून, आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. दरम्यान, एपीएमसीचे सचिव शरद जरे यांनी सांगितले, की भाजीपाला मार्केटमध्ये राठोड नावाचे अधिकारी सध्या पाहणी व सर्वेक्षण करत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल. त्या अहवालाच्या आधारे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT