‘एल्फिन्स्टन’साठी घेणार २० तासांचा ब्लॉक
ओव्हरहेड वायरमुळे रेल्वेचे काम अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : परळ ते प्रभादेवीदरम्यानचा अर्धवट पाडलेला एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेने २० ते २३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुलाचे गर्डर सुरक्षितपणे काढण्यात सर्वांत मोठा अडसर ओव्हरहेड वायरचा असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी सोमवारी (ता. २४) परळ स्थानक परिसरात पाहणी केली. ब्लॉकदरम्यान कोणत्या उपाययोजना कराव्या, पाडकाम कसे सुरक्षितपणे करायचे आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, याचीही सविस्तर चर्चा झाली. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांना २५ हजार व्होल्टचा वीजपुरवठा ओव्हरहेड वायरमधूनच मिळतो. या वायरचा एक भाग पुलाच्या खालच्या फ्रेमला जोडलेला असल्याने ती सरळ बाजूस हलवणे शक्य नाही. त्यामुळे वायर, ब्रॅकेट इन्सुलेटर आणि संबंधित उपकरणे पूर्णपणे काढावी लागणार आहेत. हे कामच तीन ते चार तासांत पूर्ण होईल, असे मानले जात असले तरी अभियंत्यांच्या मते ते वेळखाऊ आणि अत्यंत संवेदनशील आहे.
...
अधिक दक्षता घ्यावी लागणार
परळ स्थानकात पाच मार्ग आहेत. या प्रत्येक मार्गिकेवर पुलाच्या पायथ्याशी एक किंवा दोन इन्सुलेटर वेल्डेड अवस्थेत आहेत. त्यामुळे वायर काढताना अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणतीही चूक झाली तर वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेने विशेष देखरेखीचे पथक तयार केले आहे.
...
प्रक्रियेसाठी स्वतंत्र योजना
ओव्हरहेड केबल्स दोन ते चार किलोमीटर लांबीच्या असतात आणि त्या ट्रॅकलगत उभारलेल्या ओएचई मास्टला जोडलेल्या असतात. पूल पाडल्यानंतर गाड्यांच्या वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून हे मास्ट आणि त्यावरील उपकरणांचे स्थानांतरही करावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात आली आहे.
...
लवकरच ब्लॉकची घोषणा
एल्फिन्स्टन पुलाची एकूण लांबी १३२ मीटर आहे. त्यापैकी ६१ मीटर भाग मध्य रेल्वेच्या हद्दीत येतो. या भागातील संरचना हटवण्यासाठी नेमकी उपकरणे, मनुष्यबळ आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यासाठी रेल्वेने हालचाल सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत ब्लॉकची तारीख जाहीर होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात होईल. रेल्वेच्या मते, हा ब्लॉक जितका मोठा तितके काम सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.