मुंबई

ग्रीनफिल्ड महामार्ग वाढवण बंदर प्रकल्पाच्या

CD

ग्रीनफिल्ड महामार्गाला विरोध
प्रकल्पाच्या जमीन मोजणीस शेतकऱ्यांच्या अटकावामुळे तणाव

डहाणू, ता. २५ (बातमीदार) ः प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्ग आणि वाढवण बंदर प्रकल्पाकरिता भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडून मंगळवारी (ता. २५) मोजणी आणि मूल्यांकन सर्वेक्षण करण्यात येत होते; मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्ग, वाढवण बंदर प्रकल्पाकरिता, संपादित होणाऱ्या जमिनीची प्रलंबित मोजणी आणि या जमिनीवरील बाधित होत असलेली बांधकामे, वनझाडे, फळझाडे, विहिरी, बोअरवेल, तलाव, व्यावसायिक मत्स्यतलाव इत्यादींची मोजणी आणि मूल्यांकन सर्वेक्षणास भूमिअभिलेख अधिकारी मंगळवारी आले होते.
--
बंदर नको
ग्रीनफील्ड वाढवण बंदर प्रकल्पाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर शेतकऱ्यांचा विरोध झुगारून, प्रचंड पोलिस संरक्षणात मौजे वरोर येथील जमिनीची मोजणी आणि झाडांचे मूल्यांकन सर्वेक्षण करण्यासाठी, उपजिल्हाधिकारी महेश सागर आणि उपअधीक्षक भूमिअभिलेख डहाणूचे अधिकारी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला देण्याचा दर निश्चित ठरलेला नाही. शिवाय, मच्छीमार, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे बंदर नको आहे, अशी भूमिका घेत प्रचंड विरोध केला, त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
--
नियमानुसार मोजणी
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रीनफीड महामार्ग, वाढवण बंदर प्रकल्प जमीन ही राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६चे कलम ३ डी अन्वये, अधिसूचना भारत सरकारने राजपत्रात १३ ऑगस्ट २०२५ आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मोजणी व मूल्यांकन सर्वेक्षण, खातेदारांनी हद्दी, निशाणी, वहिवाट, दर्शविण्यासाठी जागेवर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मोजणी आणि मूल्यांकन सर्वेक्षणाचे काम सुरू केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT