मुंबई

घरगुती वादातून नवऱ्याने घराला लावली आग

CD

घरगुती वादातून घराला लावली आग

​अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) ः घरगुती कलह आणि नशा केलेल्या व्यक्तीने थेट आपल्या राहत्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरात असलेले दोन महिन्यांचे बाळ सुखरूप बचावले आहे. अंबरनाथ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदयनगर परिसरात घडली. थारवानी मेघना मोनटीना सोसायटीत पूजा आणि कमलेश सुखरामनी हे दाम्पत्य भाड्याच्या घरात राहते. सोमवारी (ता. २४) रात्रीपासून त्यांच्यात वाद सुरू होता. मंगळवारी (ता. २५) सकाळी हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेला पती कमलेश सुखरामनीने नशेत असताना राहत्या घराला आग लावली. या आगीत त्यांच्या घरातील सर्व साहित्य खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक शैलेश भोईर आणि अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT