मुंबई

पालिका भवना समोर होणार संविधान स्तंभ!

CD

पालिका भवनसमोर होणार संविधान स्तंभ!
आयुक्तांचे वास्तुविशारदाला आदेश
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर संविधान स्तंभ उभारण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार वास्तुविशारदला प्रशासनाने आदेश दिले असून, नियोजन करण्याबाबत सूचित केले आहे. पालिका भवनचे बांधकाम सुरू असून, त्यानंतर राष्ट्रीय ध्वजासह भव्यदिव्य स्वरूपातला संविधान स्तंभ उभारण्यात येणार आहे. कामोठे येथील सचिन गायकवाड यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पनवेलसह राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रजासत्ताकाची माहिती देणारा संविधान स्तंभ उभारण्याच्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये संविधान स्तंभ उभारावा, अशी औपचारिक मागणी सर्वप्रथम सचिन गायकवाड यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यांच्या या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत राजशिष्टाचार विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष आदेश जारी केले. या आदेशात प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारणीचे नियोजन करून प्राथमिक पावले त्वरित उचलण्याचे निर्देश होते. पनवेल तहसीलदारांना याबाबत विशेष सूचना देत पुढील कार्यवाही सुरू करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या निर्देशांचे पालन करीत पनवेल तहसील कार्यालयाने पनवेल महापालिका प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवले. यामुळे संविधान स्तंभ उभारणीची प्रक्रिया स्थानिक पातळीवर अधिक गतिमान झाली.
................
चौकट
महापालिका आयुक्तांचा ऐतिहासिक निर्णय
प्रशासनाकडून आलेल्या पत्रांचा सविस्तर अभ्यास करून पनवेल महापालिका आयुक्तांनी पालिका भवनसमोर संविधान स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तुविशारदांना तातडीने स्थान निश्‍चिती, रचना, सौंदर्यीकरण तसेच सभोवतालच्या परिसराचे नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पनवेल महापालिका भवनचा परिसर केवळ प्रशासकीय केंद्र न राहता, संविधानिक मूल्यांचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक व नागरिक अभिमानाचा केंद्रबिंदू बनणार आहे.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT